‘तणस’ : स्थानिक ते जागतिक अशा समकालीन वास्तवाची जाण करून देणारी कादंबरी!
महेंद्र कदमांनी ‘तणस’च्या निमित्तानं जागतिक पातळीवरील घडणार्या घटनांचा स्थानिक पातळीपर्यंत उमटत जाणारा प्रभाव रेखाटला आहे. समकालावरती आधारित वास्तववादी कथानक, ओघवती लेखनशैली, भाषिक माधुर्य, प्रसंगानुरूप ग्रामीण बोलीभाषेचा आलेला वापर, उत्तम संवाद, स्थल-काळानुरूप सुसंगत घटनाक्रम, व्यक्तीचित्रं ही या कादंबरीची काही बलस्थानं वाटतात.......